डिजिटल न्यूज नेटवर्क
दुर्गाप्रसाद घरतकर
गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रजेगाव कोरणी घाटावर दुर्गा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकच्या धडकेत गर्दीतील तरुण ठार झाला. या घटनेत अनेक लोक व रावणवाडी. पोलिस बालंबाल बचावले. दरम्यान, पोलिसांच्या सर्तकतेने अनेकांचे प्राण वाचले.
ही घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:१५ वाजेदरम्यान घडली.ऋतिक श्रावण अरखेल (२३), रा.पैकनटोली, गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे.
हा तरुण गोंदिया शहरातील पैकनटोली येथील दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी क्रतिक अरखेल हा तरुण कोरणी घाटावर गेला होता. कोरणी घाटावर मोठ्या प्रमाणात दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या लोकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून रावणवाडी पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर सी-६० ची चमूदेखील बंदोबस्तासाठी होती. काही दुर्गा मूर्तीचे विसर्जन सुरु होते, तर काही मूर्तीची विसर्जनासाठी येत होत्या. दरम्यान, ट्रक क्रमांक एम.एच. ३१ डी.एस.०१६० वर दुर्गा देवीची मूर्ती ठेवून गोदियाकडून कोरणी घाटावर येत असताना या ट्रकचे ब्रेक फेल झाले. उतारावरच ब्रेक फेल झाल्याने तो ट्रक पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडवर अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
या प्रकरणी विवेक संतोष दहाट मु.सावराटोली गोंदिया यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी ट्रक चालक संदीप कलपेश खरे (३१), रा. कोचेवाही ( बनाथर) याच्या विरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम २३९ १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या