पुढील ३ दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार
गेल्या मागील दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली . ओढे, नदी, नाले भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज खाली दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयाला विजा ढगांच्या गडगडाटासह अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आला आहे.
मॉन्सूनच्या परतीसाठी वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागात येत्या दोन ते तीन दिवसात पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. आज संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूरम् धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या