लग्न झाले की महिलांचा मागचा भाग का वाढतो, काय कारण असेल ?


Photo source: Instagram photo 

मित्रांनो ह्या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर मला गेल्याच आठवड्यात मिळाले. झाले असे की गेल्या आठवड्यात मी बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो. दोन्ही पाय हवेत आणि दणकून नितंबावर आपटलो. मार इतका जोरात होता की दोन तीन मिनिटे तसाच पडून राहिलो. वाटलं नक्कीच कुल्ह्याचे हाड मोडले असणार. जरा बरं वाटल्यावर उठलो. थोडी वाकडी तिकडी हालचाल केली म्हंटल ओके आहे. मग थोड्या उठाबशा काढल्या मग म्हंटल 100 टक्के ओके आहे. मला ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटले की इतका जोरदार तेही बाथरूमच्या फरशीवर पडूनही झिरो डॅमेज कसे काय? मग मला निसर्गाची योजना लक्षात आली या ब्लॉगमध्ये लग्न झाले की महिलांचा मागचा भाग का वाढतो याचा गैरसमज दूर होईल.

१) म्हणजे मानवी शरीराचा नितंब हा सेंटर पॉईंट किंवा मूलाधार आहे. त्यामुळे आपण पडल्यावर नितंबावरच पडतो. त्यामुळे निसर्गाने अशा अपघाती परिस्थितीतून सुरक्षा करण्यासाठी मानवाला जाड, मांसल, चरबीयुक्त नितम्ब दिलेले आहे. जे एखाद्या आर्मर प्रमाणे आघाताची तीव्रता कमी करण्याचे काम करते. मग महिलांना पुरुषांपेक्षा जास्त हेवी आर्मर कशासाठी बर? तर महिलांना ह्या भागात जननेंद्रिय अवयव, गर्भाशय यासारखे नाजूक व अतिमहत्त्वाचे अवयव असतात त्यांची अशा धक्यांपासून सुरक्षा करणे जास्त महत्वाचे असते त्यामुळे महिलांना जास्त जाडीचे सुरक्षाकवच प्रदान करण्यात आले. ज्यावेळी महिला गर्भवती होते त्यावेळी तर गर्भासाठी जास्तच सुरक्षेची गरज असते त्यामुळे गर्भवती स्त्रियांचे नितम्ब इतर वेळेपेक्षा दुप्पट वाढते.

२) मी नितम्बावरच पडलो होतो. मी विचार केला की हेच जर मी डोक्यावर अथवा पाठीवर पडलो असतो तर काय झाले असते. तर आज कोरा वाचकांना हे उत्तर वाचायला नसते मिळाले. डोक्यावर पडून मेंदूला इजा झाली असती किंवा पाठीवर पडल्यामुळे हृदय, यकृत किंवा फुफ्फुस डॅमेज झाले असते. म्हणजे जाड नितम्ब देऊन निसर्गाने आपले त्या भागाचे वजन वाढवलेले आहे. म्हणजे त्या भागाला सेंटर ऑफ ग्रेव्हीटी केले आहे. जेणे करून पडलो तरी वजन जास्त असल्यामुळे नितंबाचा भाग सर्वात प्रथम जमिनीला आघात करेल. त्यामुळे मेंदू, हृदयासरख्या अति नाजूक अवयवांचे संरक्षण होईल.

तर म्हणजे गर्भाचे रक्षण हा एक भाग सोडला तर प्रत्यक्ष लग्न होणे न होण्याचा नितंबाच्या वाढीशी तसा डायरेक्ट संबंध नाही. वयपरत्वे ते तर होणारच असते. त्यामुळे एखादी झिरो फिगर स्त्री दिसली तर इतर स्त्रियांनी तिचा हेवा करू नका. तिची कीव करा. व देवाचे व निसर्गाचे आभार व्यक्त करा की त्याने तुम्हाला दणकट आर्मर(कवच) दिलेले आहे.

(माझ्या ह्या उत्तरामुळे काही महिलांमध्ये असणारा न्यूनगंड आणि गैरसमज कमी होण्यास मदत होईल. काही लेखकांनी जास्त संभोग केल्यामुळे नितंब वाढते असे उत्तर दिले आहे. अशा उथळ उत्तरांमुळे स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दूषित होऊ शकतो. अगदी उपवर मुलींनाही ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यांच्यावरही शंका घेतली जाऊ शकते. महिलांनीच अशी उत्तरे लिहिली तर नितंब जाड किंवा पातळ असण्याला कौमार्य चाचणी म्हणून बघितले जाईल. कृपया भ्रम पसरवू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या