गडचिरोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा,स्वयं रक्तदाता समितीद्वारे आरमोरीत रक्तदान शिबीराचे आयोजन



दुर्गाप्रसाद घरतकर
   (Digitalgaavkari)

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा रक्त पेढीत रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती' चे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबीराचे आयोजन आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात केले होते.

यावेळी श्रेयस जोशी, कवीश्वर खोब्रागडे, स्वयम कांबळे, संकेत टिचकुले, हर्षल चौके, पंकेश किरंगे, अरविंद डूमरे, तुषार झुरे, दिगंबर चौधरी, योगेश देविकर, ओमप्रकाश साळवे, निकेश हेमके, योगेश धकाते, शुभम दुमाणे, अतुल कुथे, श्रेयस सिद्दमवार, प्रियांश तिजारे, संकेत वाकडे, अमरदिप सौंदरकर, यासिन शेख, आकाश कुथे यांनी शिबिरात रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.

यावेळी डॉ. छाया उईके, डॉ. आनंद ठिकरे, डॉ. राऊत, के. टी. किरणापुरे, मुकूल खेवले,ज्योती खेवले, राजेश्री राऊत यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम या शिबिराचे उद्घाटन झाले. परिचारिका माया पारधी, सरिता निकेसर यांनी रक्तदान शिबिरासाठी सुयोग्य व्यवस्था करून दिली. तसेच देवेंद्र कुथे, मनोज गेडाम, प्रफुल्ल खापरे, प्रफुल्ल मोगरे यांनी रकतदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली लोकांसाठी वरदान 

स्वयं रक्तदाता जिल्हा समिती ही प्रत्येक गाव आणि गावातील लोकांना रक्तदानाविषयी प्रोत्साहित करणे तसेेच गावोगावी जिल्ह्यामध्ये निःशुल्क रक्तपुरवठा करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून करत आहे गडचिरोली जिल्ह्यात ह्या समितीमध्ये अनेक युवकानी सहभाग घेतला असून खूप गरजू लोकांना रक्तदान करून त्यांना नवजीवन देण्याचे काम स्वयं रक्तदाता समिती करत आहे.

स्वयं रक्तदाता समिती चे जिल्हाध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सचिव मनोज पिपरे, सहसचिव विकास बोरकर, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर आणि इतर सहकारी यांच्या माध्यमांतून ही समिती जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे.

या समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांनी आतापर्यंत 24 ते 25 वेळा रक्तदान करून लोकांना रक्तदान हे श्रेष्ठ आहे दान आहे हे केल्याने आपल्या शरीरातील रक्त कमी होते नसून आपल्या शरीरातील नवीन रक्त तयार होतो आणि आपण निरोगी निरोगी राहण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे असे विविध रक्तदान शिबिर आयोजित करून लोकांना याचे महत्व समितीच्या माध्यमातून देण्याचे काम करत आहेत.

स्वय रकदाता समिती ही ब्रम्हपुरी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा व ईतर ठिकाणी निःशुल्क आणि तात्काळ रक्त पुरवठा करण्याचे काम करते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या