पुन्हा आला खतरनाक व्हॉट्सअँप पिंक व्हायरस इन्स्टॉल करताच सायबर गुन्हेगाराच्या हातात जातो मोबाइल डेटा ! WhatsApp Pink Scam 2023 .



दोन वर्षांपूर्वी इंटरनेट जगात धुमाकूळ घातलेला'व्हॉट्सअॅप पिंक' व्हायरस पुन्हा सक्रिय झाला आहे. व्हायरल लिंकमधून व्हॉट्सअॅपचे नवे व्हर्जन इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते व क्षणार्धात सायबर गुन्हेगार तुमचा मोबाइलच हॅक करतात.राज्यभरात गेल्या दोन दिवसांमध्ये त्याच्या तक्रारी वाढत असल्याचे ऐकिवात आहे.

व्हॉट्सअॅपला सातत्याने अपडेट येतात. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून या व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जनची लिंक फॉरवर्ड होत आहे. यात अॅपचा हिरवा रंग गुलाबी होतो, असे सांगून आकर्षित केले जाते. तज्ज्ञांच्या मते, विशिष्ट काळानंतर अशा लिंक व्हायरल होत आहेत.

परंतु त्या खोट्या आहेत. २०२१ मध्ये सर्वप्रथम 'व्हॉट्सअॅप पिंक' हाव्हायरस आला होता. त्यानंतर आता परत एकदा 'व्हॉट्सअॅप पिंक' हा व्हायरस आला असून नागरिकांनी अत्यधिक सांभाळून राहणे गरजेचे झाले आहे.

तुमच्या माहितीचा वापर कुठे केला जातो ?

मोबाइलमधील संपर्क क्रमांक,त्यातील होणाऱ्या चर्चा, ग्रुपचे नावे आदी माहिती डेटा म्हणून वापरला जातो. तो सायबर जगतात लाखो रुपयांना विकला जातो.मोबाइल हॅक केल्यानंतर तुम्ही करत असलेले ऑनलाइन व्यवहार हेरून पैसे लंपास केले जाऊ शकतात. बदनामीसाठी हे प्रयोग होतात. त्यातून तुमच्या नावाने कुठलाही गैरप्रकार, चुकीचे मेसेज पाठवले जातात.

कुठलेही येप इन्स्टॉल करताना ते मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमच्या अधिकृत अॅपमधूनच इन्स्टॉल करा.
आणि त्याच्या खालील त्याचा रिव्हाव्हज आवर्जून वाचा.

हे ॲप इन्स्टॉल केल्यास नेमके काय होते ?

व्हॉट्सअॅप पिंक लिंक सध्या सोशल मीडिया वर फिरत आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करतानादेखील तुम्हाला त्याची
जाहिरात प्राप्त होऊ शकते. त्यावर क्लिक करताच तेथून तुम्हाला लिक अनोळखी संकेतस्थळावर घेऊन जात एपीके फाइल इन्स्टॉल करण्यास सांगते, त्याद्वारे अॅप न
लिंक इन्स्टॉल होताच मोबाइलमधील संपर्क क्रमांक,फाइल मॅनेजर, व्हॉइस, लोकेशनची परवानगी मागते.सहसा वापरकर्ते ते सर्व मान्य करत पुढे जातात व काही क्षणात तुमच्या मोबाइलचा ताबा पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या हाती जातो.

अशी चूक झाल्यास काय करावे ?

चुकून असेे, ॲप लिंक इन्स्टॉल झाल्यास तत्काळ ते ॲप करा,व्हॉट्सअॅप पिंक अॅप हे हाईड होऊन जाते.ते हाईड झाल्यास मोबाइल सेटिंगअॅप्समध्ये जाऊन या
नावाचे ॲप काढून टाका.सर्व अॅपला दिलेल्या परवानग्या (परमिशन) रिमूव्ह करा. सेटिंगमध्ये जाऊन ब्राऊजर कॅच क्लिअर करा.

व्हॉट्सअप वापरकर्त्यांना विनंती आहे की आज मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये विविध प्रकारचे ऑफर, रिचार्ज ऑफर, अमेझॉन ऑफर, फ्री डाटा, अश्या अनेक प्रकारच्या लिंक पाठवल्या जातात त्या सर्व खोट्या असतात. त्या लिंक ह्या हॅकर ने बनुवून पाठवल्या जातात आणि यापासून तुमचा डाटा हॅक करण्याचा प्रयत्न करतात.

म्हणून लिंक वर क्लिक करताना वाचून आणि समजून त्यावर क्लिक करावे अशी माहिती डिजिटल ब्लॉगर श्री दुर्गाप्रसाद घरतकर याांनी  दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या