Photo use: Facebook photo अर्जुनी मोरगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आय. पी. एस. अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्राचे युथ आयकॉन आणि मोटिवेशनल स्पीकर तसेच लाखों लोकांचे प्रेरनास्त्रोत असलेले विश्वास नांगरे पाटील दिनांक ५ जून २०२३ सायंकाळी ५ वाजता, सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथ येणार आहेत.
यामधे प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी "प्रेरणात्मक व्याख्यान २०२३" वर माहिती दिली जाणार आहे.
तसेच आजच्या काळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचं नाही तर स्वतः मध्ये बदल कसे घडवून आणता येतील स्वतःची बुध्दी आणि बुध्दीचा चांगल्या कामांसाठी वापर करता येईल करियर कसे घडवून आणता येईल या सर्व विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन मा. श्री. विश्वास नांगरे पाटील सर, यूथ आयकॉन आणि आय. पी. एस. अधिकारी तसेच महाराष्ट्राचे माझी सामाजिक राज्यमंत्री मा. श्री. राजकुमारजी बडोले, तसेच सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाची वेळ आणि तारीख
दिनांक ५ जून २०२३ सायंकाळी ५ वाजता, सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथे.
या कार्यक्रमाचे आयोजन
माजी मंत्री राजकुमार बडोले आणि युथ फाउंडेशन अर्जुनी मोरगाव.
वेब माहिती : दुर्गाप्रसाद घरतकर
0 टिप्पण्या