
गोंदिया : पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३०जून आहे. एक हजार रुपयांच्या विलंब शुल्कासह ऑनलाइन लिंक करण्याची ही शेवटची संधी आहे. यानंतरही आधार-पॅन लिंक नसेल तर पॅन
निष्क्रिय होणार आहे. यामुळे ज्यांनी पॅन आणि आधारकार्ड लिंक केलेले नाही त्यांना ३० जूनच्या आतच लिंक करावे लागणार आहे.
पॅन-आधार लिंकसाठी ३० जूनची डेडलाइन ठरवली आहे
पॅन आणि आधारकार्ड महत्त्वाची कागदपत्रे आहेत. यापुढे हे दोन्ही लिंक असणे बंधनकारक आहे. लिंक करण्याची शेवटची मुदत 30 जूनपर्यंत आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार पॅनकार्ड आधारशीलिंक करणे अनिवार्य आहे.
एक हजार रुपयांच्या विलंब शुल्कासह करा ऑनलाइन लिंक
पहिल्या टप्प्यात आधार आणि पॅन मोफत लिंक करता येत होते. पण आता ३० जूनपर्यंत एक हजार रुपये विलंब शुल्क भरून लिंक करावे लागणार आहे असे पॅन विभागाचे म्हणणे आहे .
आधार-पॅन ऑनलाईन लिंक कसे कराल?
पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पहिल्यांदा या वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जाऊन आधार पॅन ऑनलाइन लिंक करता येते. आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही, हेही तपासता येते.
आधार-पॅन लिंक न केल्यास काय होणार वाचा ?
एखाद्याने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचे पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. ३० जूननंतर ते पॅनकार्ड आर्थिक व्यवहारात वापरले जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाउंट उघडणे,नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय करता येणार नाही. तसेच प्राइवेट आणि सरकारी योजना सबसिडी अश्या अनेक कामांसाठी हे वापरता येणार नाही.
0 टिप्पण्या