अमेरिकेत लोक सार्वजनिक वॉशिंग मशीन का वापरतात? ते त्यांची स्वतः ची वॉशिंग मशीन विकत का नाही घेत जाणून घ्या?
सर्वप्रथम, अमेरिकेत वॉशिंग मशीन बरोबरच ड्रायर पण आवश्यक असतो. वर्षातील काही महिने थंडी असल्याने कपडे बाहेर वाळवायची सोय नसते. तसेच आता भारतातही जसे काही सोसायटीत, चांगलं दिसत नाही म्हणून कपडे बाहेर वाळत घालायला बंदी असते तसेच अमेरिकेतही आहे.
त्याचप्रमाणे, तुम्ही कुठे राहाताय त्यावर बरंच अवलंबून आहे.
जसे की, न्यूयॉर्क सारख्या शहरात रहात असाल तर जागा छोटी असते आणि घरं प्रचंड महाग असतात. अश्या ठिकाणी घरात वॉशिंग मशीन आणि ड्रायर ठेवायला जागाच नसते.
दुसरा प्रॉब्लेम म्हणजे, वॉशर साठी गरम पाण्याचा नळ आणि ड्रायर साठी गरम हवा सोडणारा पाईप लागतो. त्याचबरोबर हाय व्होल्टेजची लाईन लागते. एवढं सगळं करण्यासाठी जागा आणि पैसा दोन्ही लागतं, जे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाला उपलब्ध असेलच असं नाही.
म्हणून मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणार्यासाठी बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये नाणी टाकून चालणारी मशिन्स ठेवलेली असतात. जिथे ती पण सोय नसते अश्या लोकांसाठी सार्वजनिक मशिन्स आणि ड्रायर असतात.
पूर्वी जसे आपल्याकडे आसपासच्या बायका जाऊन नदीवर कपडे धुवायच्या तसेच अमेरिकेत सुद्धा हा एक कार्यक्रम असतो. तुमच्या मित्रमंडळीं बरोबर शिळोप्याच्या गप्पा मारत कपडे धुण्याचा कार्यक्रम चालतो. अगदी कोणी नाही तर नेहमी येणारी मंडळी भेटतात आणि कुचाळक्या करतात.
भारतात बादलीत कपडे घेऊन जातात तर अमेरिकेत लॉंड्री बॅगमध्ये कपडे आणि दुसऱ्या हातात साबणाचा कॅन घेऊन जातात. फक्त दोन फरक आहेत, एक म्हणजे अमेरिकेत हाताने कपडे धुवायला लागत नाहीत, मशीनमध्ये टाकायचे आणि गप्पा मारत बसायचं. त्यामुळे कपडे धुवायला स्त्री आणि पुरुष दोघेही येतात. 😊😊

बहुतेक या कारणाने अमेरिकेत रोज कपडे धुतले जात नाहीत. आठवड्याचे कपडे जमा करून एकदम धुतले जातात. भारतीय लोकांना याची घाण वाटू शकेल, पण अमेरिकेत थंड हवामान असल्याने घाम जवळपास येतच नाही. रोज वापरण्याच्या कपड्यांचे, विशेषतः आतल्या कपड्यांचे निदान 6–7 तरी जोड प्रत्येकाकडे असतात. रोजचे कपडे बास्केटमध्ये टाकायचे आणि शनिवारी रविवारी घाऊक प्रमाणात कपडे धुवायचा कार्यक्रम करायचा. दोन तीन लोकांचे आठवड्याचे कपडे एकदम धुता येतील एवढी मोठी मशिन्स असतात. तर काही मशिन्स त्यापेक्षाही मोठी असतात. मशीनच्या आकारानुसार पैसे टाकायला लागतात. आणि त्यानंतरच कपडे धुवायला सुरवात केली जाते
पूर्वी जसे आपल्याकडे आसपासच्या बायका जाऊन नदीवर कपडे धुवायच्या तसेच अमेरिकेत सुद्धा हा एक कार्यक्रम असतो. तुमच्या मित्रमंडळीं बरोबर शिळोप्याच्या गप्पा मारत कपडे धुण्याचा कार्यक्रम चालतो. अगदी कोणी नाही तर नेहमी येणारी मंडळी भेटतात आणि कुचाळक्या करतात.
भारतात बादलीत कपडे घेऊन जातात तर अमेरिकेत लॉंड्री बॅगमध्ये कपडे आणि दुसऱ्या हातात साबणाचा कॅन घेऊन जातात. फक्त दोन फरक आहेत, एक म्हणजे अमेरिकेत हाताने कपडे धुवायला लागत नाहीत, मशीनमध्ये टाकायचे आणि गप्पा मारत बसायचं. त्यामुळे कपडे धुवायला स्त्री आणि पुरुष दोघेही येतात. 😊😊
अशा प्रकारच्या रोमांचक गोष्टी वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला फॉलो नक्की करा.
0 टिप्पण्या